Skip to main content

Posts

Showing posts from November, 2015

प्रिय अाज्जी

अजुनही रोज सकाळी अावाज एेकू येतो, "अाता तरी ऊठ! दहा दहा वाजेपरेंत झोपा काढता" "लवकर आटप!" एक दिवस माझे पण स्वयम्पाकघर असेल तेव्हा तू बनवायचीस त्या गोष्टी बनवेन तू करत असलेल्याच प्रमाणे वस्तू अावरेन तू दाखवलेल्याच पद्धती माझ्यासाठी खर्या अाहेत तू शिकवलेल्याच गोष्टींची माहिती अाहे त्यांचं पुढे काय होवू शकलं ते पाहायला तू नव्हतीस त्याचं पुढे काय करावं हे ही तू कधी सांगितलं नाहीस पुढे कसं करायचं ह्याबद्दल संवाद असणंही कठीणच मला िततकं काही कळायचंही नाही तू मी अाठवीत असताना शिवून दिलेला एक झगा अजूनतरी होतो अाहे तुझी जुनी जन्मपत्रिका माझ्याचकडे ठेवलीय तू वापरत असलेल्या बर्याच वस्तू दिल्या काही घरीच अाहेत जर असा विचार केला की तू विद्दूमामाकडे गेली अाहेस तर काहीवेळ खरेच वाटते तू गेल्यावर काही काळ अाम्ही सगळे भरकटल्यासारखे झालो त्या घरी कसं रहायचं तिथे करायचं तरी काय तू गेल्यावर अाम्ही उगीचच मोठे झालो किंवा प्रयत्न केला तो फसला, मग अाम्ही अाता अाधीसारखे वागतो कदाचित तू लिहिलेली जुनी पत्र मी बरेचदा वाचते तू शिकवलेल्याप्रमाणे कधीकधी विणायला घेते