अजुनही रोज सकाळी अावाज एेकू येतो,
"अाता तरी ऊठ! दहा दहा वाजेपरेंत झोपा काढता"
"लवकर आटप!"
एक दिवस माझे पण स्वयम्पाकघर असेल तेव्हा तू बनवायचीस त्या गोष्टी बनवेन
तू करत असलेल्याच प्रमाणे वस्तू अावरेन
तू दाखवलेल्याच पद्धती माझ्यासाठी खर्या अाहेत
तू शिकवलेल्याच गोष्टींची माहिती अाहे
त्यांचं पुढे काय होवू शकलं ते पाहायला तू नव्हतीस
त्याचं पुढे काय करावं हे ही तू कधी सांगितलं नाहीस
पुढे कसं करायचं ह्याबद्दल संवाद असणंही कठीणच
मला िततकं काही कळायचंही नाही
तू मी अाठवीत असताना शिवून दिलेला एक झगा अजूनतरी होतो अाहे
तुझी जुनी जन्मपत्रिका माझ्याचकडे ठेवलीय
तू वापरत असलेल्या बर्याच वस्तू दिल्या
काही घरीच अाहेत
जर असा विचार केला की तू विद्दूमामाकडे गेली अाहेस
तर काहीवेळ खरेच वाटते
तू गेल्यावर काही काळ अाम्ही सगळे भरकटल्यासारखे झालो
त्या घरी कसं रहायचं
तिथे करायचं तरी काय
तू गेल्यावर अाम्ही उगीचच मोठे झालो
किंवा प्रयत्न केला
तो फसला, मग अाम्ही अाता अाधीसारखे वागतो कदाचित
तू लिहिलेली जुनी पत्र मी बरेचदा वाचते
तू शिकवलेल्याप्रमाणे कधीकधी विणायला घेते
खोली खूप अावरलेली ठेवते
अावडते काम करायला घेतले अाहे त्यामुळे थोडं बरं चाल्लय
बर्याच ठिकाणी फिरायला पण मिळालं
शास्त्र, संगीत शास्त्र
असले विषय हाताशी अाहेत त्यामुळे
अानंदात...
"बसुरिया अब ना बजावो श्याम" हि ठुमरी मात्रं
कधीच म्हणायला घेवू शकत नाही
गेल्या सहा वर्षातली पाच तर मी घराबाहेरच रहाते अाहे
अाई पण काही वर्ष दुसरीकडे राहून अाली
(भावा)च्या गोड बायकोला मात्रं तू भेटू शकली नाहीस
तीपण तुला भेटायची राहिली
तू पूर्ण अायुष्यातली इतकी वर्ष बरोबर नसशील
हा विचार मी कधीच केला नव्हता
तू गेलीस त्यावेळी मी
खूप अारडाओरडा करायचे
अाता मी त्याहून खूप माणसाळली अाहे
अाणि धीर पण धरू शकते
तू सतत असशीलच, असंच मला वाटत असे
त्यामुळे तू बोललीस, रागावलीस, मी रागावले
काहीही झालं तरी मला काहीच वाटत नसे.
सतत बरोबर असलेल्या माणसापासून भीती कसली
अाता वाटतं, अजून सहाच वर्ष गेली अाहेत
एक दिवस, तुझ्याबरोबर जितकी वर्ष घालवली,
तितकीच एकटी घालवली हेही घडेल.
त्यावेळी तर तुला कित्ती म्हणजे कित्ती गोष्टी सांगू
असं होईल.