महाराजबागेतल्या गुंजेच्या झाडाखाली
आईबरोबर बसून घालवलेल्या संध्याकाळी
गुंजेचा पाला खाताना
गुंजा वेचून, गोळा करून,
घरी आणून सजवताना
तशाच लाल गुंजांसारखे
मखमली किडे
पाळताना, त्यांना
पावसाळ्यात पकडताना
त्यांचा पाला गोळा करताना
त्यांना लाजून गुर्फटताना
बघताना, आईला दाखवताना
मला
थोडेच माहिति होते
की हे अनुभव, आणि
ह्या आठवणी
कधी अशृ होतील
आणि लाल शर्ट घालून
त्या पावसाळ्याची आज
तहान भागवावी लागेल
आईबरोबर बसून घालवलेल्या संध्याकाळी
गुंजेचा पाला खाताना
गुंजा वेचून, गोळा करून,
घरी आणून सजवताना
तशाच लाल गुंजांसारखे
मखमली किडे
पाळताना, त्यांना
पावसाळ्यात पकडताना
त्यांचा पाला गोळा करताना
त्यांना लाजून गुर्फटताना
बघताना, आईला दाखवताना
मला
थोडेच माहिति होते
की हे अनुभव, आणि
ह्या आठवणी
कधी अशृ होतील
आणि लाल शर्ट घालून
त्या पावसाळ्याची आज
तहान भागवावी लागेल